Ad will apear here
Next
महाराष्ट्राच्या ‘राज’कारणाचे वेगळे वळण


राजकीय पक्षांच्या आयुष्यात विविध टप्पे येतच असतात. त्यापैकी काहींचे दीर्घ टप्प्यांचे, दीर्घ पल्ल्याचे परिणाम होतात. १५ वर्षांपूर्वी २००५मध्ये आजच्याच दिवशी (१८ डिसेंबर) राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व महाराष्ट्राच्या राजकारणाने वेगळेच वळण घेतले.

शिवसेनेतून त्यापूर्वी गणेश नाईक, छगन भुजबळ असे पहिल्या-दुसऱ्या फेरीतील नेते बाहेर पडले होते; पण ठाकरे कुटुंबातील कुणी हे धाडस करण्याची ही पहिलीच वेळ.

राज विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते व ही युवाशक्ती हेच राज यांचे शक्तिस्थान राहिले. पुढे दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. त्यानंतरचा राज यांचा प्रवास सर्वश्रुतच आहे.

तेव्हापासून मनसेने लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या प्रत्येकी दोन-तीन निवडणुका पाहिल्या. त्यात आधी यश व नंतर कमालीचे अपयश पचवले.

परंतु तरीही मनसे आजही महाराष्ट्रात ‘फोर्स’ म्हणून उभी आहे. कोणतीही राजकीय शक्ती एक-दोन पराभवांनी संपत नाही. ती वेगवेगळ्या रूपांत जिवंत राहतेच. अर्थात त्यासाठी काळाच्या गरजेप्रमाणे स्वत:मध्ये बदल करावे लागतात. ‘मनसे’ने तसेच स्वत:ला बदललेही आहे. आता राज हिंदुत्वाकडे झुकू लागले आहेत. हा बदल लक्षणीय व दीर्घकालीन परिणाम करणारा आहे.

आता महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आता शिवसेना सत्तेवर आहे. ज्यांच्याशी आजवर वैर जपले, त्या काँग्रेसशी सोयरीक करून सत्ता स्थापन झाली, त्यालाही आता वर्ष उलटले. आता येणाऱ्या महापालिका व नंतरच्या सार्वत्रिक निवडणुका या लिटमस परीक्षा असणार. त्यात मनसे कशी उत्तीर्ण होते, ते महत्त्वाचे.

मराठी माणूस, त्यांच्या समस्या व महाराष्ट्र जोपर्यंत अस्तित्वात आहे, तोवर राज यांची मनसे ही शक्ती राहणारच, हे राजकीय सत्य आहे. तिचे नाव व ध्वज काहीही असेल.

- भारतकुमार राऊत
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MVNJCT
Similar Posts
रिक्षा आणि सरकार! सर्वत्र कोरोनाच्या चर्चा सुरू असतानाही काल एका वेगळ्याच, अनपेक्षित व त्यामुळे धक्कादायक असलेल्या एका बातमीने लोकांची झोप उडाली. खरे तर अशा घटना कुठेकुठे अधूनमधून होत असतात; पण या घटनेची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या, संशयाचे वारेही वेग घेऊ लागले. नेमके याच काळात, जेव्हा सारे
साम्यवादाचा जनक १९व्या व २०व्या शतकात ज्याच्या क्रांतिकारी विचारांनी अवघ्या जगाला भुरळ घातली व निम्म्या जगातील राज्यव्यवस्था पार बदलून गेली, असा साम्यवादी विचारसरणीचा उद्गाता कार्ल मार्क्स याचा आज (१३ मार्च) स्मृतिदिन!
सुंदर व सत्शील दुर्गाबाई! मराठी बोलपटाचा पहिला स्त्री चेहरा दुर्गा खोटे यांचा आज (१४ जानेवारी) जन्मदिन. त्यांच्या रूपेरी स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ‘अयोध्येचा राजा’ या मराठी चित्रपटाबरोबर चित्रपट ‘बोलू’ लागला. या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. १९०५ साली जन्मलेल्या दुर्गाबाईंनी
मूकनायक! ज्येष्ठ नेते व समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशित झाला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language